एक नविन हवामान अंदाज घेऊ आलो आहे.तुमच्या महिती साठी /Maharashtra weather forecast 2024
महाराष्ट्रात एक नवीन हवामान अंदाज घेऊन आलो आहे. खास तुमच्यासाठी मागच्या वेळेस मी सांगितलेला अंदाज जवळपास 80 टक्के अंदाज खरा भरलेला आहे.त्यामुळे आता मी नवीन महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मागच्या आठवड्यात जवळपास मी सांगितलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे.
आता मी ,महाराष्ट्रावर पावसाचा जोर सध्या कसा राहणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. पावसाचा अंदाज हा हवामानावर चालणारा अंदाज मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची काम करत आहे .
आता आपण, महाराष्ट्रावर पावसाचा जोर कसा राहणार आहे. हे मी तुम्हाला सांगतो.
एक नविन हवामान अंदाज⛈⛈⛈ |
सध्याची पावसाची महाराष्ट्रावरील परिस्थिती पाहता, महाराष्ट्रत मध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिसून येत आहे. मागच्या आठवड्यामध्ये पाहिजे तेवढा अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र या आठवड्यामध्ये मुंबईच्या बऱ्याचश्या भागामध्ये पाऊस आणि चांगलाच जोर धरलेला होता. व मुंबईसारख्या ठिकाणी जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले होते. मुंबईची पाणीपुरवठा करणारी धरण या पावसामध्ये जोरदार भरलेली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती ही एकंदरीत कोकण किनारपट्टी लगत चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. कोकणातील बरे जिल्हे या पावसात जोरदार जोडपून निघणार आहे. व कोकणातील नद्यांना महापूर येण्याची संकेत दिसून येत आहे.
कोकणातील जिल्हे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे शहर, व संपूर्ण मुंबईचा भाग या पावसात चांगलाच जोडपल्या जाणार आहे. खास करून मुंबईच्या जनतेने हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती पाहता, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्या कमी दाबाचे क्षेत्र हे हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा बराचसा भाग हा या पावसाने चांगला झुडपल्या जाणार आहे.
विदर्भामध्ये पावसाचा अंदाज ,गडचिरोली, चंद्रपूर नागापूर, गोंदिया भंडारा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, आणि बुलढाणा या विदर्भाच्या भागांमध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे.
त्या पाठोपाठ महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये या कमी दाबाचे पट्ट्याचे चांगला जोर दिसून येणार आहे. महाराष्ट्र मध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता कोकण किनारपट्टी वगळता, उर्वरित महाराष्ट्रात कमी पाऊस हा मागच्या आठवड्यामध्ये झालेला होता.
मात्र आता पंधरा तारखेपासून जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, म्हणायला हरकत नाही.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर जवळपास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे.
कोणत्या विभागात कसा पाऊस पडणार आहे? ते तुम्हाला आता मी सांगतो.
समुन्द्र किनारा |
कोकण विभाग; सध्या जर आपण कोकणाची परिस्थिती बघितली तर कोकणामध्ये काही जिल्ह्यात व तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडणार आहे. कोकणाची परिस्थिती ही सध्या चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने कोकणात सांगितलेला आहे. कोकण विभागात हवामान खात्याच्या अंदाजानुर, कोकणात नद्यांना पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचा प्रभाव अरबी समुद्राकडे दिसून येत असल्याने. कोकणातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये ,अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने 15 तारखेपासून देण्यात आलेला आहे. कोकणातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेला आहे. सध्या जर समुद्राची स्थिती पाहता अरबी समुद्रात उंच लाथा निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणामधील, सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागालगत अति जोरदार पाऊस होणार आहे. तरी तेथील नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेष महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कोकण किनारपट्टी लगत उंच लाटा व सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
मुंबई लगतच्या भागांमध्ये व किनारपट्टी लाठा उठणार असून ,येथील नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या लगत फिरूनहे कारण लाटांचा वेग आणि उंची पारच जास्त असणार आहे.
कोकणातील मच्छीमारांना विशेष सूचना- मच्छीमारांनी समुद्रात उंच लाटा उसळत असताना समुद्रात मासे पकडण्यासाठी जाऊ नये. कारण उंच लाटा मध्ये माशी पकडणे खूपच अवघड जाते. त्यामध्ये आपली बोट पलटी होण्याची फारच शक्यता असते.
व पर्यटकांनी सध्या तरी कोकणात जाणे टाळावे, कारण कोकणात सध्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्रकाठी कुणीही पर्यटक जाऊनही याची काळजी घेणे नागरिकांनी महत्त्वाचे आहे.
आता आपण उर्वरित राहिलेल्या विभागाची माहिती पाहणार आहोत.
पश्चिम महाराष्ट्र मध्ये पावसाचा अंदाज कसा राहणार आहे. मि थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राचा काही भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. 15, तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाला सुरुवात होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये व पुणे शहरांमध्ये चांगला पाऊस होणारा असून तेथील नद्यांना पूर येण्याची संकेत दिसून येत आहे. त्यामुळे पुणेकरांनी स्वतःची काळजी घेणे फारच गरजेचे आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा ,सांगली या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा जास्त राहील. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात पावसाचा जोर सुद्धा सांगणार राहील आणि त्याच पाठोपाठ सांगली या जिल्ह्यात सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार असल्याची हवामान खात्याने शक्यता वर्तवलेली आहेत. त्याच पाठोपाठ ,अहमदनगरचे दक्षिणेकडील तालुक्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे. अति जोरदार पाऊस होऊन तेथील धरणाचा पाणीसाठा वाढणार असून नदीकाठच्या गावांनी सतर्कते चा इशारा हवामान खात्यावरील आहे.
उर्वरित राहिलेला भाग म्हणजेच उर्वरित राहिलेली जिल्हे, सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. कारण, सोलापूर जिल्ह्यामध्ये फारच कमी पाऊस मध्यंतरी काळात झाला होता. आता मात्र पंधरा तारखेपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात होण्याचा अंदाज दिसून येत आहे. सोलापूर मधील काही धरणांमध्ये या पावसामुळे पाणीसाठा वाढवण्याची शक्यता निर्माण होण्याचा, अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
आता आपण मराठवाड्याकडे वळणार आहोत. मराठवाड्यातील पावसाचा अंदाज कसा राहणार असल्याचा तुम्हाला मी सांगणार आहे.
मराठवाड्यामध्ये संभाजीनगर पासून जर बघितले तर, संभाजीनगर मध्ये काही तालुक्यांमध्ये मागच्या वेळेस पावसाने दांडी मारली होती. मात्र आता पंधरा तारखेपासून संभाजीनगरच्या काही तालुक्यांमध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याने असा अंदाज वर्तवलेला आहे. संभाजीनगर शहराची स्थिती पाहता सध्यातरी संभाजीनगर मध्ये जवळपास चांगला पाऊस सुरू आहे. संभाजीनगरच्या काही तालुक्यांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार असून बरेच मंडळामध्ये अतिवृष्टी सुद्धा होणार आहे. एकंदरीत संभाजीनगर वगळता, आपण आता, जालना जिल्ह्याकडे पावसाची स्थिती कशी राहणार आहे. हे बघणार आहोत जालन्यातील बरेच तालुक्यामध्ये कमी पाऊस झालेला आहे मात्र आता 15 , तारखेपासून दक्षिणेकडील तालुक्यामधील पावसाचा जोर कायम राहणार असून, उर्वरित तालुक्यांमध्ये म्हणजे, जाफराबाद चा काही भाग चांगला पाऊस होणार मात्र जाफराबाचाच उत्तरेकडील भाग थोडा कमी पाऊस राहणार असून त्या तालुक्यातील नागरिकांनी हा महत्त्वाचा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
उर्वरित तालुक्या, भोकरदन भागात सुद्धा असाच पावसाचा अंदाज दिसून येत आहे. म्हणजेच जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये फारच कमी पाऊस दिसून येत आहे. तेथील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे. जालना जिल्ह्यातील गुरुवारी तालुक्यात जवळपास काही मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून, पण राहिलेल्या तालुक्यांमध्ये अजून सुद्धा शेतकरी प्रतीक्षेत आहे. मात्र 15, तारखेपासून जालना जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज दिसून येत आहे.
त्याच पाठोपाठ मराठवाड्यातील बाकी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच हिंगोली ,नांदेड, लातूर, धाराशिव आणि संभाजीनग,र जालना या भागामध्ये पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही. 15 तारखेपासून अपेक्षित पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
आता आपण उत्तर महाराष्ट्राची पावसाबद्दल स्थिती पाहणार आहोत.
उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक, जळगाव, धुळे ,नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार असून, नाशिकच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिक मध्ये बरेच तालुक्यामध्ये अतिवृष्टी होणार असून, तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे. कारण म्हणजे तरी काळा उत्तर महाराष्ट्र सुद्धा कमी पाऊस झाला असल्यामुळे आता मात्र पंधरा तारखेपासून सुद्धा उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, नद्यांना पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जळगाव जिल्ह्याची स्थिती पाहता, जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून, जळगाव मध्ये सुद्धा नद्यांना नाल्यांना पूर येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
धुळे ,नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार असून तेथील नागरिकांनी व त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
उर्वरित विदर्भामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. पश्चिम बंगालचे उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते शेत्र विदर्भा मार्गी महाराष्ट्र मध्ये येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. आणि हळूहळू ते कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भागात सुद्धा जाणार आहे. मध्यप्रदेशच्या काही भागांमध्ये ही कमी गावाची शेत्र चांगला परिणाम दाखवणार आहे. त्या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज दिसून येत आहे.जवळपास पंधरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रावर चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज दिसून येणार आहे. कारण मागच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पंधरा तारखेपासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
वरील हवामान अंदाज महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घेऊन. घराबाहेर पडणे टाळावे. आणि वरील दिलेल्या हवामानाचा अंदाज मध्ये जर काही अचानक बदल झाल्यास तुम्हाला ताबडतोब मेसेज दिला जाईल.
टीप . वरील दिलेल्या हवामानामध्ये बदल होऊ शकतो. कारण शेवटी हवेच्या भरोशावर हा हवामान अंदाज सांगितला जातो.
Comments
Post a Comment