पाऊसा बद्दल आज पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे, तुमच्या माहिती साठी, महाराष्ट्रात मागच्या आठवड्यामध्ये मुंबईच्या बऱ्याचश्या भागामध्ये पाऊस झाला .मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. आता हळूहळू महाराष्ट्राचा बराचसा भाग या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.या पाऊसाचे प्रमाण अधिक असणार आहे. या पावसामध्ये तीव्रता ही जास्त असणार आहे. हा पाऊस बंगालचे उपसागर कमी दाबाची क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे पावसाचा वेग जास्त वाढणार आहे.
मागच्या आठवड्यामध्ये हा पाऊस जास्त जोर नसल्यामुळे मुंबई लगत किनारपट्टी भागात जास्त पडला आणि त्याच पाठोपाठ कोकण किनारपट्टी लागत जास्त पाऊस झाला आहे.महाराष्ट्रातील उर्वरित भागात हा पाऊस पाहिजे तेवढा अपेक्षितपणे पडलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही. या पावसाच्या या आठवड्यामध्ये म्हणजेच वीस तारखेपासून जास्त वाढणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र आणखी तीव्र झाल्यामुळे हा पाऊस महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पडणार आहे? आता आपण ते जाणून घेणार आहोत. |
बंगालच्या सागरातील कमी दाबाचे शेत्र |
महाराष्ट्र मध्ये मागच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी खूपच पाऊस झाला तर काही ठिकाणी फारच कमी झाला, मात्र आता महाराष्ट्रभर पाऊस होणार आहे. कारण पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये ची कमी दाबाचे क्षेत्र जास्त झाले आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे.
महाराष्ट्र मध्ये या कमी दाबाचे क्षेत्राचा कोणत्या भागावर परिणाम होणार आहे ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे.
आता आपण विदर्भाची स्थिती पावसाबद्दल काय असणार आहे?
विदर्भात या कमी दाबाच्या पट्ट्याचे जास्त प्रभाव असणार आहे. विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. विदर्भामध्ये हा पाऊस जास्त जोर दाखवणार असल्याचा अंदाज आहे, विदर्भामध्ये चंद्रपूर, नागपूर ,गडचिरोली ,भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यामध्ये जास्त प्रभाव असणार आहे. महाराष्ट्र मध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर वीस तारखेपासून जास्त दिसून येणार आहे.
विदर्भामधील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार असून येथील नागरिकांनी सादर करण्याचा व स्वतःच्या सोयीनुसार आपापल्या व सुरक्षित ठिकाणी जाऊन बसणे आवश्यक आहे.
विदर्भातील उर्वरित जिल्ह्यामध्ये असाच पाऊस असणार आहे जास्त करून विदर्भात हा कमी दाबाचा पट्टा जास्त प्रभावशाली असणारा असून तेथील नद्यांना नाल्यांना पुरविण्याची संकेत दिसून येत आहे.
हा कमी दाबाचा पट्टा अतिथी होणार असून महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हा पाऊस जास्त होणार असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
विदर्भामध्ये, 20 तारखेपासून हा पाऊस ते ,23 तारखेपर्यंत हा पाऊस जास्त असणार आहे.
मराठवाड्याची पावसाबद्दल काय स्थिती असणार आहे?
|
मराठवाड्यामध्ये एकंदरीत परिस्थिती |
मराठवाड्यामध्ये ,एकंदरीत परिस्थिती पाहता, संपूर्ण मराठवाड्यात मागच्या आठवड्यामध्ये पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही परंतु काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. आणि काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली कारण असे की, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये पावसाने दांडी मारली मात्र आता जालना जिल्हा व परभणी, नांदेड, हिंगोली, व संभाजीनगर च्या काही भागांमध्ये वीस तारखेपासून जोरदार पाऊस होणार आहे.
कारण जो बंगालचा कमी दाबाचे क्षेत्र ही विदर्भातून मराठवाड्यावर सुद्धा जोर दाखवणार आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर मध्ये अति जोरदार पाऊस होणार आहे. त्या पाठोपाठ मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्राची पावसाबद्दल थोडक्यात आपण परिस्थिती पाहणार आहोत.
उत्तर महाराष्ट्र मध्ये जळगाव खान्देश या भागामध्ये मागच्या वेळेस चांगला पाऊस झालेला होता. मात्र जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने मोठा खंड दिलेला होता आणि काही तालुक्यांमध्ये जास्तच पाऊस झालेला होता मात्र आता या वेळेस संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सुद्धा बंगालच्या उपसागरात च्या कमी दाबाची पट्ट्याचा प्रभाव जास्त दिसून येणार आहे.
नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती पाहता मागच्या आठवड्यामध्ये भाग बदलत बदलत जोरदार पाऊस झालेला होता. मात्र नंदुरबार मधील काही तालुक्यांमध्ये पूर्णपणे कोरडी गेली होती. मात्र आता वीस तारखे पासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये अति जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस २० तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत जवळपास पूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्ये चांगला जोर धरणार आहे.
नाशिक मध्ये मागच्या वेळेस चांगला पाऊस झालेला होता. आता सुद्धा वीस तारखेपासून चांगला पाऊस येणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वरती दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्र मध्ये सध्या स्थिती पावसाची काय असणार आहे?
पश्चिम महाराष्ट्र मध्ये या आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. अरबी समुद्रातून येणारे वारे या वाऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला चांगला फायदा होणार आहे. कारण या कमी दाबाच्या पट्ट्याची स्थिती कोकण किनारपट्टी जास्त असणारा असून याचा फायदा पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्रातील ,सातारा ,सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये अति जोरदार पाऊस होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा वीस तारखेपासून चांगला पाऊस होणार असून तो 23 तारखेपर्यंत चांगला जोर दाखवणार आहे.
कोकण किनारपट्टी लागत पश्चिम महाराष्ट्रातील काही लागून जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्र हे कोकण किनारपट्टी लगत महाराष्ट्रात व अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राला जॉईन होऊन चांगला पाऊस या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पडणार आहे.
जर एखाद्या वेळेस हवामानामध्ये अचानक बदल झाल्यास महाराष्ट्रातील नागरिकांना ताबडतोब मेसेज दिला जाईल याची सर्व महाराष्ट्रातील व देशातील नागरिकांना नोंद घ्यावी.
टीप- वरील दिलेल्या हवामानामध्ये अचानक बदल होऊ शकतो शेवटी हवेच्या भरोशावर हा आवाहन अंदाज सांगितला जातो.
Comments
Post a Comment