येरे येरे पावसा, राज्यात -पावसामुळे- शेतकऱ्यांच्या- पेरण्या -थांबल्या, शेतकऱ्यांना- लागली -पावसाची ओढ/ weather forecast(IMD)
महाराष्ट्र; राज्यामध्ये पावसाने सध्या दांडी मारली असून शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पेरण्या करून टाकल्या आहे. होते नव्हते बी बियाणे, जमिनी टाकून दिली आहे.तर काही ठिकाणी पावसामुळे शेतकरी पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहत आहे. काही ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरण्या करून टाकले आहे. आता त्यांची बी बियाणी धोक्याच्या पातळीत आहे.
महाराष्ट्र मध्ये सध्या पावसाचा मोठा खंड, पावसाची शेतकऱ्यांना ओढ! weather forecast
`weather forecast,देशात जून महिन्यातील सरासरी पेक्षा 20% कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राची चिंता वाढली आहे. कारण या पावसात बळीराजा अवलंबून असतो परंतु आता पेरणी करायची की नाही या द्विधा मनस्थितीत मध्ये शेतकरी अडकला आहे. अनेक भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. weather forecast,जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असा सल्ला ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ देत आहेत. महाराष्ट्रात मात्र अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुप कसपी
यांनी दिली.
दक्षिणेकडील काही राज्यात वगळता जवळपास सर्वच प्रदेशांमध्ये पाऊस कमी झाला असून, अर्ध्या देशात अजून मान्सून पोहोचलेला नाही. तसेचं तो म्हणावा तसा बरसलेला नाही. उत्तरेकडील राज्यामध्ये तर उष्णतेच्या लाटा जाणवत आहे.
देशामध्ये उष्णतेची लाट सध्या कोठे? 🌞🌞🌞
देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश काही भाग हरियाणा, दिल्ली, पंजाब ,जम्मू कश्मीर ,उत्तराखंड, राजस्थान, झारखंड, आणि मध्यप्रदेश या भागात 18 जून रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
देशामध्ये सध्या 9 राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम! 🌞🌞🌞
देशाच्या दक्षिण भारतात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, जम्मू , हिमाचल ,दिल्ली, उत्तर प्रदेश ,पंजाब ,राजस्थान ,बिहार आणि झारखंडमध्ये उष्णतेच्या लाठीचा इशारा जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेशात 24 तास उष्णतेच्या लाठी मुळे 90 जणांची मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासन ही मान्य करण्यास नकार दिला आहे. संशोधन नानंतर हे मृत्यू उष्णतेमुळे झाल्याचे स्पष्ट होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र बहुतांशी मृत्यू उष्णता मुळे झाल्याची डॉक्टरांची स्पष्ट म्हणणे आहे.
राष्ट्रीय Dilli राजधानीत मंगळवारी कमाल तापमान 45 अंश तापमान नोंदविले गेले असून, या हंगामातील ही तापमान सामान्य तापमानापेक्षा सहा अंश सेल्सिअस अधिक आहे.
दिवसभर उष्णतेची लाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून येत आहे. हवामान खात्याने दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारी काही प्रमाणात तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
पावसाने का घेतला ब्रेक, चला तर मग बघूया कारण काय? ⛈⛈⛈
`weather forecast,राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सर्व भागात कमी अधिक पाऊस होत आहे. मात्र मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे पावसाने हा मोठा ब्रेक घेतला आहे. तापमानात वाढ होत असून, हवेतील आद्रता 60% वर गेली आहे. त्यामुळे वातावरणात दमट झाले असून, जनसामान्यांना गामा घुम होत आहेत.
आपल्याला जर या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आपण प्रत्येकाने या पावसाळ्यात एक तरी, झाड लावने आवश्यक आहे. उष्णतेपासून का व तापमानापासून सुटका मिळवण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. याचाच फायदा पुढील येणाऱ्या काळातील पिढीसाठी होणार आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने एक झाड तरी लावणी आवश्यक आहे.
Comments
Post a Comment